व्हायकिंग कार्यक्रम

आठव्या ते अकराव्या शतकातील स्कँडेनेव्हियन,  म्हणजे उत्तर युरोपातील नॉर्वे, स्वीडन, आइसलँड, फिनलंड, डेन्मार्क या देशातील  खलाशी व्हयकिंग म्हणून ओळखल्या जायचे. हे खलाशी व्यापारी तर होतेच पण ते चांगले योद्धे आणि लुटारू पण होते. ते नौका आणि  जहाजबांधणी ते तरबेज होते.  पण मुख्य म्हणजे  ते निर्भिड होते आणि कुठली ही मोहीम घेण्यात ते घाबरत नसत. त्यांच्या या गुणावरून अमेरिकेच्या १९७५ च्या मंगळ कार्यक्रमाला व्हायकिंग असे नाव देण्यात आहे.

हा तेव्हाचा सर्वात खर्चिक आणि मह्त्वाकांशी कार्यक्रम होता. यात दोन यानांची व्हायकिंग-१ आणि व्हायकिंग-२ उभारणी करण्यात आली होती.  दोन्ही व्हायकिंग मध्ये  ऑरबायटर आणि लॅंण्डर अशा दोन्ही यंत्रणा बसवण्यात आल्या होत्या. ऑरबायटर चे मुख्य कार्य   मंगळाची परिक्रमा करत  मंगळाच्या पृष्ठ भागाचे चित्रण  तसचे पृथ्वी ते लॅंण्डर यांच्या मघ्ये दळणवळणाचा दुवा असणे होते.

व्हायकिंग लॅंण्डर हे मंगळावर उतरून मंगळाचा अभ्यास करणार होते. ते पाठवताना पृथ्वीवरील कुठले ही सजीव (अगदी जीवाणु सुद्धा) सजीव अवस्थेत मंगळावर पोचू नयेत ही मोठी खबरदारी घेण्यात आली होती. लॅंडरचा आकार षटकोनी ठेवण्यात आला होता आणि हा ती पायावर उभा राहील अशी व्यवस्था होती.  संपूर्ण लॅंडरला निर्जंतूक करण्या करता या यानाला १११ अंश सेल्सियस इतक्या तापमानात ४० तास ठेवण्यात आले होते. आणी जेव्हा ऑरबायटर आणि लॅंडरयांनी पृथ्वी चे वातावरण सोडून मंगळाच्या दिशेने प्रवास सूरू केला तेव्हा यांच बाहेरच आवरण सुद्धा वेगळ करून टाकण्यात आले होते.

व्हायकिंग-१ चे उड्डाण २० ऑगस्ट १९७५ तर व्हाकिंग-२ चे त्या नंतर लगेच ९ सप्टेंबर रोजी करण्यात आले आणि सुमारे १० महीन्यांचा प्रवास करून व्हायकिंग-१ ने ने १९ जून आणि मग पाठोपाठ व्हायकिंग-२ ने ७ ऑगस्ट रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. जेव्हा यांनी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला तेव्हा लॅंडर हे ऑरबायटर जोडलेले होते. ही जोडी जवळ जवळ एक महीना मंगळाची परिक्रमा सुमारे ३०० कि.मी. उंची वरून करत होती आणि या कालावधीत यांनी मंगळाची अनेक चित्रे पृथ्वी कडे पाठवण्यात आली. या सर्व चित्रांचा अभ्यास करून मग  लॅंडरला मंगळावर नेमक कुठे उतरावायच हा निर्णय घेण्यात आला.

लॅंडरला मंगळावर उतरवण्याच्या कार्यक्रण मग चार टप्यात पूर्ण करण्यात आला. सर्वप्रथम लॅंडरला ऑरबायटर पासून वेगळ करण्यात आले. या वेळी यांची गती दर सेकंदाला ४ कि.मी. होती. काही तासांनी मग लॅंडरला मंगळाच्या दिशेने वळवण्यात आले – यातला डी-ऑर्बिट बर्न म्हणतात. आता लँडरला मंगळाच्या वातावरणाचा गतीरोध जाणवायला सुरवात झाली. मंगळाच्या वातावरणातील घटकांची घर्षणामुळे लॅंडर तापून त्यातील उपकरणांना क्षती पोचू नये म्हणून त्या भोवती एक कवच लावलेले होते.  या वेळी तापमान किती वाढतं. तसेच गती कशी कमी होते, तापमानात तसेच वातावरणाच्या दाबात आणि घनतेत कसा बदल घडतो याचे आकडे गोळा करून पृथ्वी कडे पाठवण्यात आले होते.  जेव्हा लॅंडर मंगळाच्या पृष्ठभागापासून सुमारे ६ कि.मी. उंची वर होते तेव्हा त्याची गती आता दर सेंकंदाला फक्त २५० मीटर राहिली होती. या वेळी आता लॅंडरचे पॅरॅशूट उघडण्यात आले. या पॅरॅशूटचा व्यास १६ मीटर होता. त्या नंतर ७ सेंकंदाने लॅंडरचे उर्जा कवच वेगळे करण्यात आले. आणि त्यां नंतर ८ सेकंदाने लॅंडरचे ३ पाय बाहेर काढण्यात आले.

सुमारे ४५ सेंकंदाच्या प्रवासा नंतर लॅंडरची गती आता सेकंदाला ६० इतकी कमी झाली होती. जेव्हा लॅंडर मंगळाच्या पृष्ठ भागा पासून १.५ कि.मी. उंची वर होते तेव्हा त्याच्या प्रवासाच्या विरूद्ध दिशेने  रॉकेट सोडून त्याची गती कमी करण्यात आली. आणि मग ४० सेंकंदाने जेव्हा लॅंडरने आपले पाय मंगळवर ठेवले तेव्हा त्याची गती दर संकंदाला २.४ मीटर दर सेंकंदाला होती. एखाद्या वस्तूला मंगळावर उतरण्या करता ही गती जरी थोडी जास्त असली तरी या गतीने मंगळवर उतरून – उतरून काय तर धडक देऊन लॅंडर मधील उपकरणांना सुरक्षित ठेवण्याची क्षमता या लॅंडरच्या रचनेत होती.

व्हयकिंग-१ लॅंडर २० जुलै तर व्हायकिंग-२ लॅंडर ३ जुलै रोजी मंगळावर उतरलं. तर वर दोन्ही ऑर्बायटर मंगळाची चित्र घेण्याची आणि इतर शास्त्रीय निरीक्षण घेण्याची काम अविरत करतच होती.

व्हायकिंग-१ ने मंगळावर उतरल्या नंतर २५ सेंकंदातच मंगळाची चित्र घेण्यास सुरवात केली – त्यांना ही चित्र घेण्यास ४ मिनीटे लागली. या कालावधीत त्याने आपला शक्तीशाली एंटेना कार्यांनवित केल्या. या एंटेनाच्या मदतीने आता पृथ्वीवर संदेश पाठवण शक्य झाले. तसेच मंगळाच्या वातावरणाचे निरीक्षण घेण्या करता उपकरणे पण कार्यान्वित पण करण्यात आले. पुढच्या सात मिनीटात लॅंण्डर ने मंगळाचे ३०० अंशाचे पॅनोरॅमिक चित्र पृथ्वी कडे पाठवले. त्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याने सर्वप्रथम मंगळाचे रंगीत चित्र पाठवले.

व्हायकिंग-२ चे मंगळावर उतरवण्याची प्रक्रिया पण व्हायकिंग-१ सारखीच होती. फक्त काही कारणा मुळे त्याची गती कमी करण्याचे रॉकेट शुन्य पूर्णाक चार संकंद जास्त वेळ चालू होत. त्या मुळे त्याने मंगळावर खूप धूळ उजवली आणि त्याचा एका पाया खाली एक दगड आला आणि त्या मुळे हा ८.२ अंशाने कललेल्या स्थितीत स्थिर झाला. त्या मुळे पुढचे चार महिने याच्या कडून संदेश येण अवघड झाल होत.

या चारी यंत्रांनी म्हणजे दोन्ही ऑरबायटर आणि दोन्ही लॅंडरनी आपल्याला मंगळाबद्दल खूप नवीन आणि पुढच्या मोहिमा आखण्यासाठी महत्वाचे आकडे आणि माहीती पाठवली.

व्हायकिंग-२ ऑरबायटर ला त्यातील इंधन गळू लागल्या मुळे २५ जुलै १९७८ रोजी (१ वर्ष ११ महीने आणि १८ दिवसांनी) बंद करण्यात आलं. त्या नंतर व्हायकिंग-२ लॅंडरला ११ एप्रिल १९८० रोजी त्याची बॅटरी खराब झाल्याने बंद करण्यात आलं. व्हायकिंग-१ लॅंडर ने ६ वर्ष ३ महिने आणि २२ दिवस कम केलं. मानवी चुकी मुळे या लॅंडरचा एंटेना खाली करण्यात आला आणि त्या नंतर या लॅंडरशी संपर्क  २० जुलै १९७६ रोजी कायमचा तुटला.

व्हायकिंग-१ ऑरबायटर ला १७ ऑगस्ट १९८० रोजी त्याची कक्षेत उंची स्थिर करण्यासाठीचे इंधन संपल्यामुळे बंद करण्यात आलं.