व्हायकिंग लॅंडर – प्रयोग आणि निष्कर्श

मंगळावरील च्रेसी प्लॅटिनिया (म्हणजे स्वर्णिम सपाट) च्या पश्चिम भागात २० जुलै १९७५ रोजी व्हायकिंग १ लॅंडर उतरले होते. हा भाग मंगळाच्या सरासरी व्यासाच्या सुमारे २.७ किलोमीटर खाली आहे.  
ज्या भागात व्हायकिंग १ लॅंडर उतरले त्या भागाला नंतर थॉमस मच मेमोरियल स्टेशन असे नाव देण्यात आले. ,ते  या मोहिमेचे प्रमुख होते.
गेल्या सदरात सांगीतल्या प्रमाणे व्हायकिंग -१ लॅंडरने मंगळावर पाय ठेवल्याच्या २५ संकंदा नंतर मंगळाचे चित्र घेण्यास सुरवात केली. हे पॅनोरॅमिक चित्र व्हायकिंगला पृथ्वी कडे पाठवायला चार मिनीटे लगाली. हे चित्र रंगीत नव्हतं पण  दुसरे दिवशी त्याने मंगळाचे पहिले रंगीत चित्र पाठवले.  या चित्रात मंगळाचा हा पृष्ठभाग अगदी पृथ्वी सारखाच दिसत होता. इतका की पहिल्यांदा बघताना हे पृथ्वीवरील एखाद्या जागेचे चित्र असावे असे वाटावे.
लॅंडर उतरल्या नंतर त्यातील एक एक यंत्रण  हळू हळू  सुरू करण्यात आली. मंगळावर भूकंपांची मोज घेणारे यंत्र आपल्या जागेवरून बाहेर येत नव्हत. त्याला बाहेर काढणारा जो यांत्रिक हात होता त्याल तो प्रवासात हलू नये म्हणून जखडून ठेवण्यासाठी लावलेली त्याची पिन अडकली होती.  मग या हाताला झटेल देऊन ही पिन सोडवण्याचा प्रयोग करण्यात आला. सात दिवसांच्या प्रयत्नां नंतर ही पिन निघाली आणि हे यंत्र बाहेर काढण्यात यश आले.
मंगळाच्या पृष्ठभागवरून अभ्यास करण्यासाठी जी उपकरणे पाठवण्यात आली होती त्या सर्व प्रथम म्हणजे दोन कॅमेरे होते जे विविध दीशांची चित्र आपल्याला पाठवत होते.  मंगळावर कधीकाळी सजीव होते का याचा शोध मंगळाच्या मातीत चयापचय क्रिया होउ शकते का याचा शोध घेण्या साठी तीन वेगवेगळे प्रयोग करण्यात आले होते.  तसेच मंगळाच्या पृष्ठ भागावर वातावरणाचा दाब, तापमान, वायूचा वेग, मंगळावर चुंबकीय क्षेत्राची मोज घेणारी अशी अनेक यंत्र होती.
मंगळाच्या मातीचे विश्लेणातून ही माती साधारण पृथ्वीवर अढळते तशी ज्वालारसासारखी होती. या मातीत फार मोठ्या प्रमाणात सिलीका आणि लोह यांची मात्रा होती पण त्याच बरोबर मॅग्नेशियम, एल्युमिनियम, सल्फर, कॅशियम आणि टायटेनियम असल्याचे पण दिसून आले. या मातीतील पोटॅशियमचे प्रमाण पृथ्वीच्या तुलनेत एक पंचमांश होते. तर पृष्ठ भागावरू घेतलेल्या मातीच्या काही नमुन्यात सल्फर आणि क्लोरीनचे प्रमाण पृथ्वीवर समुद्रकिनाऱ्यावर वाष्पीभवन झाल्या नंतर मिळणाऱ्या वाळूत असते तस होत. तर पृष्ठभागाच्या खालच्या भागामध्ये घेतलेल्या नमुन्यात सल्फरचे प्रमाण कमी होत. याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच अस मत व्यक्त केल होत की इतर नमुन्यात सल्फर कदाचित इतर मुलद्रव्याच्या संयुगाच्या स्वरूपात – म्हणजे सोडियम, मॅग्नेशिय, कॅशियम किंवा लोहच्या संयुगाच्या स्वरूपात असेल. याची पुष्टी नंतरच्या मोहीमांमधून झाली.
मंगळाच्या मातीच्या नमुन्यांच्या निरिक्षणांचे परीक्षण आणि इतर अभ्यासांनंतर असा अंदाज करण्यात आला की एकूण मातीचे स्वरूप ज्वालासार मातीत सारखे आहे ज्यात ९० टक्के लौह मिश्रित चिकणमातीच प्रमाण आहे तर १० टक्के मॅग्नेशिय सल्फेट, ५ टक्के कॅलशिम आणि ५ टक्के लोहचे ऑक्साईड.
मातीच्या नमुन्याना तापवले पण ज्या प्रमाणे हे नमुने तापवण्यात आले त्यावरून या नमुन्यां मध्ये किती पाणी होत हे सांगण आवघड होत.   पण एका अंदाजा प्रमाणे  सुमारे १ टक्का पाणी या नमुन्यांमध्ये  असले  पाहीजे. तर  वजनाच्या सुमारे ३ ते ७ टक्के भागात चुंबकीय गुणधर्म असलेले खनीज होते.
व्हायकिंग-२ हे ३ सप्टेंबर १९७६ रोजी व्हायाकिंग १ च्या पश्चिमेस २०० किमी अंतरावर उतरले होते. व्हायांकिग-२ ने केलेल्या परिक्षणांचे निष्कर्श पण व्हायकिंग-१ सारखेच होते.
याच बरोबर महत्वाचा प्रयोग म्हणजे मंगळावर सजीव कधी होते का याचा शोध घेण्याचा होता. त्याची चर्चा आपण पुढच्या सदरात करूया.  पण थोडक्यात म्हणणे मंगळाच्या मातीत मेटाबॉ़लिझम किंवा चयापयच ही क्रिय घडते का याच शोध तीव वेगवेगळ्या प्रयोगातून करण्यात आला होता.  यातील दोन प्रयोगातील निष्कर्श या मातीत सजीवांच्या अस्तित्वास नकार देणारी होती तर एका प्रयोगात उत्तर होकारार्थी मिळत होत. पण त्यावर ही इतर शास्त्रज्ञानी  प्रश्न चिन्ह उभे केले होते.
असो त्या वेळेस या मोहिमां बद्दल वाचतान आज हे लिहिताना या मोहिमा आश्चर्य चकित करणाऱ्या वाटतात.  मंगळ आपल्या जवळ असताना सुद्धा किती दूर आहे याचा अंदाज प्रकाशाच्या गतीने मंगळावरू पृथ्वीवर येणाऱ्या संदेशांना आपल्या पर्यंत पोचायलाच मुळी १५ मिनिटे लागतात या वरून घेता येतो आणि इतक्या अंतरावरून एखादी यंत्रणा अचूक चालवण किंवा त्यात काही बिघाडझाल तर तो दुरूस्त करण  म्हणजे काही साधीसूधी गोष्ट नक्किच नाही.