सूर्यमालेच्या वेशीवर

खगोलशास्त्राच्या संदर्भात आपण अस म्हणतो की इथे शास्त्रज्ञ फक्त निरिक्षक असतो. तो प्रयोग करू शकत नाही. जे निसर्ग देतो तेच तो बघू शकतो. त्यात इतर शास्त्रांसारखे त्याला बदल करता येत नाहीत. याला काही फार थोडे  अपवाद म्हणजे उल्का पाषण ज्यांनी निर्मिती सूर्यमालेच्या निर्मिती बरोबर झाली, चंद्रावरून आणलेले तिथल्या मातीचे नमुने आणि इतर काही ग्रहांवर उतरलेल्या कृत्रिम यांनानी तिथल्या परिस्थितीची पाठवले.  या व्यतिरिक्त सूर्यावरून येणारे विद्युतभारित कण म्हणजे सौरवायू. या सर्व अपवादामुळे मिळालेल्या माहीतीची टक्केवारी इतर निरिक्षणांच्या म्हणजे विद्युत चुंबकीय लहरींच्या माध्यामातून मिळणाऱ्या माहितीच्या तुलनेत नगण्य आहे. आणि तरीही काही वेळा छोटी माहीती सुद्धा महत्वाची ठरते.  आणि अशीच माहीती गेले ३५ वर्ष व्हॉयेजर एक आणि दोन ही याने आपल्या पाठवत होती.  आणि आज व्हॉयेजर-१ आपल्या प्रवासाच्या अशा टप्यावर पोचले आहे की ते अतराळात अतरतारकीय अवकाशात प्रवेश करत आहे. म्हणजे ते आता सूर्याच्या गुरूत्वीय प्रभावतातून बाहेर पडत आहे. इतकेच नव्हे तर ते आपल्या बरोबर पृथ्वी बद्दलची माहीती पण घेऊन जात आहेत.

व्हॉयेजर – २ नी २० ऑगस्ट तर  व्हॉयेजर-१ ने ५ सप्टेंबर १९७७ रोजी पृथ्वीवरून उड्डाण केले. पण व्हॉयेजरची गती जास्त आणि कक्षा थोडी असल्या मुळे ते व्हॉयजर -२ च्या पुढे गेले.  आणि आज ३५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी नंतर ही याने पृथ्वीच्या संपर्कात आहेत.  या दोन्ही यानानचे वजन ७२२ किलोग्रॅम आहे.

या  दोन्ही यानांच्या उद्दष्ठात वायुच्या मोठ्या ग्रहांना आणि त्यांच्या उपग्रहांना भेट देऊन त्यांच्या बद्दल ची माहिती पाठवण्याचे होते.  आणि तसेच या यानानी आपल्याला गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहाबद्दल मोठ्या प्रमाणात नवीन माहीती पाठवली. पण त्या नंतर यांना सूर्या पासून दूर आंतरतारकीय अवकाशाच्या दिशेने वळवण्यात आले.

नुकतच नासाने जाहीर केले की गेल्या वर्षी व्हॉयेजर-१ हीलिओस्फियर मधून सुद्धा बाहेर पडले आहे आणि त्याचा प्रवास आता अंतरतारकीय अवकाशात सुरू झाला आहे.  सूर्याची एक सीमा आहे. सूर्यातून पडलेले सौरवायून एका ठराविक अंतरावर पोहोचल्यावर त्यांना आंतरतारकीय वायू चा अवरोध होतो. सौरवायू हा सर्व दिशाना फेकल्या जात असल्या मुळे याला हिलिओस्फियर म्हणतात तर सीमेला हिलीयोपॉज म्हणतात.  आणि तिथली परिस्थीती कशी आहे त्या भागचे गुणधर्म काय आहेत याची माहिती व्हॉयेजर ने पाठवली आहे. सुमारे २००९ साल ते २०१२ पर्यंत व्हॉयेजर-१ कॉस्मिक किरणात वाढ होत असल्याचे जाणवले. या कालावधीत ही वाढ २५ टक्यानी जास्त झाली होती तर मे २०१२ – ही वाढ फक्त एकाच महीन्यात ९ टक्यानी जास्त होती.  याच अर्थ शास्त्रज्ञानी आता व्हॉयेजर सूर्यमालेची सीमा सोडत आहे असा काढला व  २५ ऑगस्ट २०१२ रोजी या यानाने सूर्यमालेची सीमा ओलांडली हे जाहीर केले.

इतर शास्त्रीय उपकरणांबरोबर ही दोन्ही याने आपल्या बरोबर पृथ्वीवरून एक संदेशाची तबकडी पण घेऊन जात आहेत.  ही तबकडी सोन्याची बनवलेली आहे. कल्पना अशी आहे की जर समजा या यानांना कुठल्या एखाद्या प्रगत जीवानी पकडले तर त्यांना पृथ्वी बद्दल माहीती मिळावी.

जुन्या काळात एखाद्या बेटावर अडकलेले नाविक आपल्या जागेची माहीती एका बाटलीत सील बंद करून समुद्रात सोडत असत. कल्पना अशी की जर कुणाला ही बाटली सापडली तर त्याना आपल्या बद्दल माहीती मिळावी ज्या मुळे ते आपल्याशी संपर्क साधू शकतील. याच भावनेने ही तबकडी पाठवण्यात आली आहे.

या तबकडीवर पृथ्वी आणि आपल्या बद्दलच्या माहीतीचा मोठा साठा आहे.  ही तबकडी प्रसिद्ध शास्त्रज्ञ, विज्ञान प्रसारक कार्ल सागान यांच्या नेत्रुत्वा खाली एका समितीने तयार केली होती. यावर एकूण ११६ पृथ्वीवरची चित्र आहेत ज्यात शास्त्रीय माहिती – सूर्याच्या तुलनेत पृथ्वीचे स्थान, गणितीय रचना, डी.एन.ए ची रचना. त्यांचा तुलनेत आकार. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक ध्वनी – लाटांचे,  वायूचे, प्राण्यांचे आवाज, पक्षांचे आणि व्हेल माशाचे आवाज आहेत. या शिवाय वेगवेगळ्या देशातील संगीतकारांच्या रचना आहेत.

अनेक आवाजां बरोबर या तबकडीवर चुंबनाचा आवाज पण घालण्यात आला होता.  ज्याचे  रेकॉर्डिग सर्वात अवघड ठरलं होतं. जेव्हा अनेक प्रयत्न करून सुद्धा संगीत दिगदर्शक जीमी आयोवीन यांना कुठलाच आवाज पसंत पडला नाही तेव्हा त्यांनी स्वतःच्या बाहूवर चुंबनाचा आवाज केला. पण तो ही कुणाला आवडला नाही. आणि मग या तबकडीचे प्रोड्युसर टिमोथी फेरीस यानी हळूच कार्ल सगान यांच्या पत्नी एँन ड्रएन यांच्या गालाच चुंबन घेतले.  तेव्हा  रेकॉर्डिंग चालु होते – आणि हा आवाज सर्वाना ‘परफेक्ट’ वाटला.

यावर स्त्री पुरूषांचे नैसर्गिक रूपातील चित्र टाकण्याचे या समितीने ठरवले होते. हा निर्णय फार वादग्रस्त ठराला होता. शेवटी त्याचे रेखांकृत चित्र टाकाण्यात आहे.

यावर त्या वेळच्या अमेरिकेचे राष्ट्रपती जिमी कार्टर आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष कुर्ट वॉल्डाईन यांचे संदश आहेत. याच बरोबर जगातील जुन्या आणि नवीन अशा ५५ भाषातून शुभसंदेश पाठवण्यात आले आहेत. यात दक्षिण आशीयातील १२ भाषांचा समावेष आहे त्या बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, ओरिया, पंजाबी, राजस्थानी आणि तेलगु या भारतीय भाषांमधून संदेश आहेत.

मराठीतून  “नमस्कार. ह्या पृथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही ह्या जन्मी धन्य व्हा.” तर हिंदीतून “धरती के वासियों की ओर से नमस्कार”  असे संदेश आहेत.

शास्त्रीय संगीतात बेथुवन, मोझार्ट सारख्या दिग्गजांच्या रचना बरोबर केसरबाई केरकर यांच्या आवाजात भैरवी रागात ‘जात कहां हो..’  ही साडेतीन मिनीटांची रचना पण आहे.   केसरबाईंनी अनेक गुरूं कडून संगीताचे शिक्षण घेतले होते. त्या अब्दुल करीम खांन,  रामकृष्णबुवा वझे आणि उस्ताद अल्लादिया खान हे प्रमुख आहेत.

तुम्हाला हे आवाज नासाच्या या  संकेत स्थळावर ऐकायला मिळतील –

http://voyager.jpl.nasa.gov/spacecraft/sounds.html

व्हॉयेजर हे सेकंदाला १७ किलोमीटर म्हणजेच तासाला ६१ हजार किलोमीटर या वेगाने प्रवास करत आहे.   आणी ते आपल्या पासून १८७ कोटी किलोमीटर म्हणजे पृथ्वी आणि सूर्या यांच्यातील अंतरातच्या १२५ पट आहे. या अंतरावरून रेडिओ संदेशाना आपल्या पर्यंत येणास सुमारे १७ तास आणि २० मिनीटे लागतात.